रत्नागिरी : श्रीराम मंदिरात आज नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विन वैद्य यांचे मार्गदर्शन

Jun 8, 2024 - 10:42
 0
रत्नागिरी : श्रीराम मंदिरात आज नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अश्विन वैद्य यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिध्द नेत्ररोगतज्ञ व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अश्विन वैद्य हे 'ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाची डोळ्यांची काळजी व उपचार' या विषयावर शनिवार ८ जून २०२४ रोजी सायं. ४ वा. रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात मार्गदर्शन करणार असून या मार्गदर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

श्रीराम मंदिर देवस्थानात मागील काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 'श्रीराम कट्टा'चे कार्य सुरु आहे. या 'श्रीराम कट्टा'चे माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यात येतात तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांचे मार्गदर्शन सर्व नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येते. श्रीराम कट्टा'चे व्यासपीठावरुन रत्नागिरीतील सुप्रसिध्द नेत्र शल्य विशारद व नेत्र रोगतज्ञ डॉ. अश्विन वैद्य हे 'ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावयाची घ्यायची डोळ्यांची काळजी व विविध उपचार' या विषयावर ८ जूनला शनिवारी सायं. ४ वा. होणाऱ्या सभेत सर्वांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 08-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow