कोकण किनारपट्टी भागात पावसाला जोर..

Jun 28, 2024 - 10:00
Jun 28, 2024 - 10:07
 0
कोकण किनारपट्टी भागात पावसाला जोर..

रत्नागिरी : अरबी सागरात मोसमी पाऊस पूर्ण क्षमेतेने सक्रिय झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. गुरुवारीही कायम होता. पुढील तीन दिवस दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून, रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर गुरुवारही सकाळपासूनच पावसाची सक्रियता कायम होती. रत्नागिरीसह दापोली, खेड, गुहागर तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पात्र इशारा पातळीवर पोहोचले असून, जलस्तर इशारा पातळीवर ०.१० मीटरने उंचावला आहे. जगबुडीची इशारा पातळी ५ मिटर असून, धोका पातळी सात मिटर आहे. त्यामुळे किनारी गावांना सतर्कतेच्या आणि सावधगिरीच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात ६७.६३ मि.मी.च्या सरासरीने ६०८.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात ५५.५० मि.मी. दापोलीत ८२.३०, खेडमध्ये ७२.८०, गुहागर तालुक्यात सर्वाधिक ९८.३०, चिपळूणमध्ये ६३, संगमेश्वर तालुक्यात ५१.३०, रत्नागिरीत ७९.३०, लाजा तालुक्यात सर्वातकमी ३५.९० आणि राजापूर तालुक्यात ७०.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून ७०५ मि.मी. च्यासरासरीने ६३५३ मिमी एकूण पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद चिपळूण तालुक्यात (९०० मि.मी.) तर सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात (५४५ मि.मी.) झाला आहे. गतवर्षी या दिवसापर्यंत जिल्ह्यात २०१ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली होती तर एकूण पावसाने केवल १९०० मि.. मी. ची मजल मारली होती. त्या तुलनेत यावर्षी पाऊस तिपटीने जादा झाला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गला 'ऑरेंज'
अरबी सागरात मोसमी पावसाचा जोर वाढल्याने कोकण किनारपट्टी भागात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow