चिपळूण : तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.४० टक्के

May 28, 2024 - 11:41
May 28, 2024 - 11:45
 0
चिपळूण : तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.४० टक्के

चिपळूण : तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.४० टक्के लागला आहे. तालुक्यातील ७२ शाळांपैकी तब्बल ६४ शाळांचा तालुक्यातून एकूण ३ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यातील ३ हजार ५०६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी ३ हजार ४८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातून प्रथम येण्याचा मान युनायटेड इंग्लिश स्कूलची ईप्शीता टिळक हिने पटाकावला आहे. तिला या परीक्षेत ९९ टक्के गुण मिळाले आहेत. दहावी परीक्षेत १ हजार ३०२ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत, १ हजार ५३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५८७ द्वितीय श्रेणीत तर ६२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे युनायटेक इंग्लिश स्कूलचा निकाल ९९.५७ टक्के लागला. २३५ पैकी २३४ विद्यार्थी उतीर्ण झाले. शिरगाव विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल सावर्डेचा १०० टक्के निकाल लागला आहे. परांजपे मोतीवाले हायस्कूलचा निकाल ९५.७४ टक्के लागला आहे. यामध्ये ९४ पैकी ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हाजी अमीन हायस्कूल कालुस्तेचा निकाल ९५.६५ टक्के, यामध्ये ४६ पैकी ४४ झाले आहेत.

मिलिंद हायस्कूल रामपुरचा निकाल १०० टक्के. ४५ पैकी ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल भोमचा निकाल १०० टक्के न्यू इंग्लिश स्कूल मार्गताम्हाणे विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ५० पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण जनता माध्यमिक विद्यालय कोकरेचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील ५३ पैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

इंग्लिश स्कूल आमळीचा निकाल १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल पोफळीचा निकाल १०० टक्के, यामध्ये ४८ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी-सती विद्यालयाचा निकाल १०० टक्के. २९७ पैकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. न्यू इंग्लिश स्कूल निवळीचा निकाल ९७.४३ टक्के. यामध्ये ७८ पैकी ७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, राजसागर इंग्लिश स्कूल दहीवलीचा निकाल १०० टक्के, यामध्ये १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दलवाई त्यस्कूल मिरजोळीचा निकाल १०० टक्के, १६ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आदर्श विद्यामंदिर चिवेलीचा निकाल १०० टक्के, १६ पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल कोसबी फुरुस विद्यालयाचा निकाल १०० टक्के, २७ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण.

माध्यमिक विद्यालय असुर्डे-आंबतखोलचा निकाल १०० टक्के, ६२ विद्यार्थी उत्तीर्ण, महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणचा निकाल १०० टक्के लागला असून ६० पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण, मोहर विद्यालय आकलेचा निकाल १०० टक्के  २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण, पी. के. सावंत माध्यमिक विद्यालय अडरेचा निकाल १०० टक्के, ३९ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण. अलोरे हायस्कूलचा निकाल ९९.२० टक्के लागला असून १२६ पैकी १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. छत्रपती शिवाजी विद्यालय कामथे टेरवचा निकाल १०० टक्के, ७१ पैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण, श्री दत्त विद्यालय दळवटणे-मोरवणेचा निकाल १०० टक्के लागला असून २७ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण. आ. बा. सावंत माध्यमिक विद्यालय नायशीचा निकाल १०० टक्के विद्यालयातील २४ पैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण, जे बाय, शिर्के हायस्कूल कुटरेचा निकाल १०० टक्के लागला असून १४ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण न्यू इंग्लिश स्कूल वहाळाचा निकाल १०० टक्के, ५२ पैकी ५२ विद्यार्थी उत्तीर्ण न्यू इंग्लिश स्कूल पेढे परशुरामचा निकाल १०० टक्के लागला असून, १२७ पैकी १२७ विद्यार्थी उत्तीर्ण एस. व्ही. विद्यालय निरबाडे-काडवलीचा निकाल १०० टक्के, १९ पैकी १९. विद्यार्थी उत्तीर्ण.

न्यू इंग्लिश स्कूल करंबवणेचा निकाल १०० टक्के. १२ पैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण बांदल हायस्कूल चिपळूणचा निकाल १०० टक्के लागला असून ४२ पैकी ४२ विद्यार्थी उतीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल पाचाड मालघर-शिरळचा निकाल १०० १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण, आर. आर. शिंदे माध्यमिक विद्यालय नांदिवसे - ओवळीचा निकाल २०० टक्के, यामध्ये १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल तिवरेचा निकाल १०० टक्के, १४ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण, प्रगती माध्यमिक विद्यालय मालदोली-बिबलीचा निकाल १०० टक्के. १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण, उर्दू हायस्कूल वाघीवरेचा निकाल १०० टक्के. माध्यमिक महिला विद्यालय पागचा निकाल १०० टक्के लागला असून २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. न्यू इंलिश स्कूल उभळेचा निकाल १०० टक्के १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिवरामशेठ लांजेकर विद्यालय कळमुंडीचा निकाल १०० टक्के लागला असून २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल नांदगावचा निकाल १०० टक्के. २७ पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण न्यू इंग्लिश स्कूल कळंबटचा निकाल १०० टक्के. ३९ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले नूतन माध्यमिक विद्यालय कालुस्तेचा निकाल ८५.७१ टक्के, यामध्ये १४ पैकी १२ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल वीरचा निकाल १०० टक्के २५ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण, ख्रिस्तज्योती स्कूल वालोपे हायस्कूलचा निकाल १०० टक्के. १६३ पैकी १६३ विद्यार्थी उत्तीर्ण, नूतन माध्यमिक विद्यालय डूगवे-शिरवलीचा निकाल १०० टक्के लागला असून ४८ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल तोंडलीचा निकाल १०० टक्के लागला असून, १७ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल तळसरचा निकाल १०० टक्के लागला असून, १९ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

आदर्श माध्यमिक विद्यालय कात्रोळीचा निकाल १०० टक्के लागला. माध्यमिक विद्यालय दोणवलीचा निकाल १०० टके. ११ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण. माध्यमिक विद्यालय बोरगावचा निकाल १०० टक्के. २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकीचा निकाल १०० टक्के, २२ पैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण, न्यू इंग्लिश स्कूल खडपोलीचा निकाल १०० टक्के, २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अल अमिन उर्दू हायस्कूल पोफळीचा निकाल १०० टक्के, २९ पैकी २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सुमन विद्यालय टेरबचा निकाल १०० टक्के लागला असून ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोरेश्वर माध्यमिक विद्यालय गुहेचा निकाल १०० टक्के, न्यू इंग्लिश स्कूल पाग विद्यालय चिपळूणचा निकाल १०० टक्के. खातून अब्दुल्ला सेकंडरी हायस्कूल गोवळकोटचा तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुर्तवडेचा निकाल १०० टक्के लागला.

न्यू इंग्लिश स्कूल मांडकीचा निकाल १०० टक्के, ७ पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण, सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश स्कूल मार्कडी चिपळूणचा निकाल १०० टक्के. ११८ पैकी ११८ विद्यार्थी उत्तीर्ण, नॅशनल इंग्लिश स्कूल मिरजोळीचा निकाल १०० टक्के. ९५ पैकी ९५ विद्यार्थी उत्तीर्ण. मेरीमाता स्कूल खेर्डीचा निकाल १०० टके. १५६ पैकी १५६ विद्यार्थी उत्तीर्ण, इक्रा इंग्लिश स्कूल गोवळकोटचा निकाल १०० टक्के, २० पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण, धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश स्कूल खेर्डीचा निकाल ९२.६८ टक्के. यामध्ये ४९ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण, प्रतिभा एन. कदम इंग्लिश मिडीयम स्कूल मार्गताम्हानेचा निकाल १०० टक्के असून ५ विद्यार्थी उत्तीर्ण, इंग्लिश मीडियम स्कूल मार्गताम्हानेचा तसेच इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

इंग्लिश मीडियम स्कूल पागचा निकाल १०० टक्के. १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रिगल प्लब्लिक स्कूल कोंढेचा निकाल १०० टक्के लागला असून, ९ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण, अली पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के, ३ पैकी ३ विद्यार्थी उत्तीर्ण, अली पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के. या प्रशालेत ५६ पैकी ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 28/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow