कोकण रेल्वेसाठी 'पॅच डबलिंग'चा निर्णय

Jun 25, 2024 - 12:52
 0
कोकण रेल्वेसाठी 'पॅच डबलिंग'चा निर्णय

रत्नागिरी : कोकण मार्गावरील रेल्वे हाऊसफुल्ल धावत असल्याने जादा स्पेशल गाडय़ा चालवण्याची प्रवाशांकडून सातत्याने मागणी होते. मात्र एकेरी रेल्वे रुळामुळे रेल्वे गाडय़ा चालवणे शक्य होत नाही. या मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव आल्यानंतर त्यामध्ये नैसर्गिक मर्यादा असल्याने आता 'पॅच डबलिंग'चा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे.

तसा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला पाठवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रस्तावास हिरवा पंदील मिळाल्यास कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी होऊन नवीन जादा स्पेशल चालवणे शक्य होईल.

१'पॅच डबलिंग'मुळे संपूर्ण मार्ग दुपरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे, त्या भागातच दुहेरीकरण केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यांतून व पुलावरून जात आहे. हे बोगदे व पूल एकेरी रुळांसाठी बांधले आहेत. मार्गाचे दुपरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे त्या ठिकाणी रुंदीकरण करावे लागणार असून नवीन पुलांची उभारणी करावी लागणार आहे. या बाबी खर्चिक त्यामुळे सद्यस्थितीत 'पॅच डबलिंग' करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:20 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow