दापोली : वराडकर-बेलोसे महाविद्यालयाला नॅककडून 'बी प्लस' दर्जा

Jun 25, 2024 - 11:05
Jun 25, 2024 - 13:07
 0
दापोली : वराडकर-बेलोसे महाविद्यालयाला नॅककडून 'बी प्लस' दर्जा

हर्णे : दापोली तालुक्यातील प्रख्यात महाविद्यालय म्हणून गणले जाणाऱ्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयास 'नॅक'कडून बी दर्जा मिळाल्याची माहिती वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कराड यांनी दिली.


वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे बँक मूल्यांकन १२ अणि १३ जूनला झाले. नॅक कमिटीसमोर उत्तम गुण मिळण्यासाठी प्राचार्य, विभागप्रमुख, क्रायटेरिया प्रमुख, ग्रंथपाल, एनएसएस, एनसीसी, क्रीडा आणि सांस्कृतिक विभागप्रमुखांनी सादरीकरण केले तसेच बँक कमिटीने संस्थेचे कार्यकारिणी, आजी-माजी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधला. अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन, संशोधन, सल्लामसलत आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती, व्यवस्थापन आणि नेतृत्व, सामाजिक उपक्रम व नावीन्यपूर्ण पद्धती, आदी सात मुदयांवर नॅक समितीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे सभापती धनंजय यादव व प्राचार्य डॉ. भारत कराड आणि आयक्युएसीचे समन्वयक डॉ. गणेश मांगडे यांच्या नेतृत्वाखाली कॉलेजचे मूल्यांकन झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:30 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow