रत्नागिरीच्या सार्थक आठवलेची भारतीय सैन्यदलाच्या प्रशिक्षणासाठी निवड

Jun 25, 2024 - 13:57
Jun 27, 2024 - 11:37
 0
रत्नागिरीच्या  सार्थक आठवलेची  भारतीय सैन्यदलाच्या  प्रशिक्षणासाठी  निवड

रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र सार्थक समीर आठवले याची राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) येथे भारतीय सैन्यदलात समावेशासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. खडकवासला (पुणे) आणि डेहराडून येथे तो चार वर्षे प्रशिक्षण घेणार आहे.

सार्थकचे वडील वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) असून अकौंटंट म्हणून नोकरी करतात. विशेष म्हणजे घरात सैन्यात जाण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या दोघांनी आपल्या मुलाचे सैन्यात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि त्याला सर्वतोपरी पाठिंबा दिला.

खडकवासला येथे सार्थकचे प्रशिक्षण २५ जूनपासून सुरू होणार आहे. सार्थकच्या या यशाबद्दल आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांनी सार्थक आणि त्याचे आई-वडील यांचे पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सार्थकच्या या यशाबद्दल त्याच्या मित्र मंडळी, नातेवाईक, परिवार यांच्यातर्फेही अभिनंदन करण्यात येत आहे.

सार्थकने शासकीय सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत अकरावीत प्रवेश घेतला. तिथे बारावी झाल्यानंतर त्याने एनडीएसाठी तयारी सुरू केली. सप्टेंबर २०२३ मध्ये परीक्षा देऊन तो भारतात २६७ व्या रैंकने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या प्रवासात त्याला आईवडिलांची खंबीर साथ मिळाली. या प्रशिक्षणातही यश मिळवून भारतीय सेनेत दाखल होऊन देशसेवा करू, असे सार्थकने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow