डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Jun 25, 2024 - 13:46
 0
डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

 टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत झाली. यामध्ये अफगाणिस्तानने विजय मिळवल्याने यंदाच्या टी-20 विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आले आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (David Warner has retired from international cricket) मात्र, तो आयपीएलसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

डेव्हिड वॉर्नरने 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. यानंतर, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिड वॉर्नरची कसोटी कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली असली तरी, तो एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये खूप यशस्वी ठरला. याशिवाय डेव्हिड वॉर्नर हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. या खेळाडूच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2016 जिंकले. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:15 25-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow