मंडणगडमध्ये पावसाचा घरांना फटका; ३ लाख ३६ हजारांचे नुकसान

Jun 27, 2024 - 10:58
Jun 27, 2024 - 11:03
 0
मंडणगडमध्ये पावसाचा घरांना फटका;  ३ लाख ३६ हजारांचे नुकसान

मंडणगड : मंडणगडात पावसाचा जोर वाढला असून, पावसात अनेक गावांतील घरे कोसळून नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ३ लाख ३६ हजारांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. २६) पावसाने दुपारनंतर मुसळधार कोसळण्यास सुरुवात केली.

तालुक्यात गेले पाच दिवस चांगला पाऊस कोसळत असल्याने शेतकरी सुखावला आहे, भातरोपांची वाढ चांगली झाली असून, शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. पणदेरी येथील विजय जाधव यांचे पूर्ण घर कोसळल्याने त्यांचे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. दाभट गावातील संतोष पवार यांच्या घरावर वीज कोसळून १५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. तळेघर येथे शरद आंजर्लेकर यांच्या घराची पडझड होऊन ३५ हजारांचे नुकसान झाले. पाट येथे विलास दिवेकर यांचे ६ हजार रुपयांचे अंशतः नुकसान झाले. तिडे शाळेचे २० हजारांचे नुकसान झाले. घोसाळे येथील शांताराम पोस्टुरे यांच्या घरावर झाड पडून १० हजार रुपयांचे नुकसान झाले. पणदेरी कविता पालकर यांच्या घराचे १ लाख रुपयांचे पूर्णतः नुकसान झाले. पंचनामे करण्यात आले असून, आपत्कालीन सतर्कतेने काम करत आहे. तालुक्यातील भारजा, निवळी नद्या दुधडी भरून वाहत असून सर्वच ओहोळ, नाले ओसंडून वाहत आहेत. शेतशिवारात तुडुंब पाणी भरल्याने खालाटीत पाणीच पाणी झाले आहे, तालुक्यात आतापर्यंत ५२९.३८ मिमी पावसाची नोंद झाली. शेतीच्या कामांना वेग आला असून, शेतकरी शेतात राबताना दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow