रत्नागिरीत मोकाट जनावरांचा ठिय्या

Jun 25, 2024 - 10:36
 0
रत्नागिरीत मोकाट जनावरांचा ठिय्या

रत्नागिरी : शहरात पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा उपद्रव सर्वत्रच वाढला आहे. शहरासह तालुक्यात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे प्रशासनाला अवघड झाले आहे. सध्या या मोकाट जनावरांनी रस्त्यात ठाण मांडून बसण्यास सुरुवात केली असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गावर तसेच शहरातील इतर रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच चौका-चौकात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने वाहनचालकांसह पादचारी त्रस्त झाले आहेत. काही केल्या मोकाट जनावरे रस्त्यावरून हलत नसल्याने रस्त्याच्या बाजूने साईडपट्टीवरून वाहने चालविण्याची वेळ वाहनधारकांवर येत आहे. रत्नागिरी शहरासह मिऱ्या-नागपूर महामार्गावर या मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. वासरांसोबत ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने रात्रीच्या वेळी ही जनावरे दिसून येत नाही. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडून चंपक मैदान येथे पत्र्याची शेड उभारुन तिथे ठेवण्यात आले होते. मात्र, तरीही जनावरे मोकाट सोडण्याच्या प्रकाराला आळा बसलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 25/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow