'मला टार्गेट करु नका, मी हलका नाही' : आमदार शेखर निकम

Jun 27, 2024 - 12:09
 0
'मला टार्गेट करु नका, मी हलका नाही' : आमदार शेखर निकम

चिपळूण : चिपळूण (Chiplun) मधील सावर्डेत दूषित पाण्यावरुन (polluted water) शेतकरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भर बैठकीतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केला.

यावेळी 'मला टार्गेट करु नका, मी हलका नाही, असे शेखर निकम म्हणाले. दरम्यान, आमदार शेखर निकम यांच्या भूमिकेवरून त्यांच्याच गावातील ग्रामस्थ प्रचंड नाराज असल्याचे पाहायला मिळालं. कात भट्टीतील दूषित पाण्यावरुन सावर्डे भुवड वाडीतील ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

कात भट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या गावात म्हणजेच सावर्डेत सध्या कात भट्टीच्या दूषित पाण्याचा प्रश्न पेटला आहे. पावसाळ्यात कात भट्टीतले काळे पाणी ग्रामस्थांच्या थेट शेतामधून विहीर आणि नद्यांमध्ये जाऊन पाणी दूषित होत आहे. यामुळं स्थानिक ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. या प्रश्नांवरून स्थानिक आमदार शेखर निकम यांच्याकडे वारंवार तक्रार करुन देखील संबधित कात भट्टी मालकाने उपाय योजना न केल्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी आमदार शेखर निकम यांच्यावर देखील प्रश्नांचा भडिमार केला. निकम यांना याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला. मात्र, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून आमदार शेखर निकम यांनी देखील मला टार्गेट करू नका असे म्हणत मी पण हलका नाही, असा इशाराच उपस्थित शेतकऱ्यांना भर बैठकीत दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 27-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow