UNGA : संयुक्त राष्ट्रात मित्र देशाच्या मदतीसाठी भारताची मोठी खेळी

Sep 19, 2024 - 15:49
 0
UNGA : संयुक्त राष्ट्रात मित्र देशाच्या मदतीसाठी भारताची मोठी खेळी

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे दोन घनिष्ट मित्र आहेत. या दोन मित्र देशांनी नेहमीच अडचणीच्या काळात भारताला साथ दिली आहे. काश्मीर मुद्यावर वेळोवेळी या दोन्ही देशांनी भारताला साथ दिली आहे.

संरक्षण क्षेत्रात हे दोन्ही देश भारताचे भागीदार आहेत. भारतही वेळोवेळी अडचणीच्या काळात त्या देशांना साथ देत असतो. हे दोन देश आहेत, रशिया आणि इस्रायल.

भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पॅलेस्टाइनच्या मुद्यावर मतदानापासून दूर राहणं पसंत केलं. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या क्षेत्रावर जो बेकायद ताबा मिळवलाय तिथून 12 महिन्याच्या आत मागे हटावं, असा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर भारताने मतदानात सहभागी होणं टाळंल. या प्रस्तावाच्या बाजूने 124 देशांनी मतदान केलं. 14 देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. यात इस्रायल, अमेरिका हे देश आहेत.

काय म्हटलं होतं या प्रस्तावात?

भारतासह 43 देशांनी मतदानात सहभागच घेतला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, नेपाळ, युक्रेन आणि ब्रिटन हे देश मतदानापासून लांब राहिले. इस्रायलने बेकायदरित्या पॅलेस्टाइनचा जो भूभाग बळकावलाय तो 12 महिन्याच्या आत परत करावा असा प्रस्ताव बुधवारी मंजूर झाला. इस्रायलकडे ताबा असलेल्या पॅलेस्टाइन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याच उल्लंघन झाल्यास इस्रायलला जबाबदार ठरवलं पाहिजे असं या प्रस्तावात म्हटलं होतं.

प्रस्तावाविरोधात इस्रायलच्या बाजूने वोटिंग करणारे देश

अमेरिका

इस्रायल

अर्जेंटीना

चेक रिपब्लिक

फिजी

हंगेरी

मलावी

माइक्रोनीशिया

नौरू

पलाउ

पापुआ न्यू गिनी

प्राग

टॉन्गा

टुवालू

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow