'नवरा माझा नवसाचा २' आजपासून सिनेमागृहात

Sep 20, 2024 - 11:05
 0
'नवरा माझा नवसाचा २' आजपासून सिनेमागृहात

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

उत्तम कथा, दमदार अभिनय, खुसखुशीत संवाद, श्रवणीय संगीत असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाची निर्मिती, कथा पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. त्याशिवाय हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते लिठीपुट या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत, 

कॅमेरामन म्हणून पराग देशमुख आणि नितीनचंद्र बांदेकर यांनी काम पाहिले आहे. वैभव जोशी, प्रवीण दवणे, अवधूत गुझे, संतोष पवार यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, जितेंद्र कुलकर्णी, रविराज कोलधरकर यांचे सुमधुर संगीत लाभते आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू अरोरा, विभावरी जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. वेंकीने ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला होता तो अतिशय रंजक होता. आता या चित्रपटात कोणता नवस कोण फेडणार आणि कसा. हे बघण्यासाठी तुम्हाला पिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा लागणार आहे. उत्तम विनोद, तपासराचं कथानक, लव्हस्टोरी असं पुरेपूर मनोरंजन या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow