चिपळूण पालिकेने केली सांस्कृतिक केंद्रातील खुर्चांची दुरुस्ती
चिपळूण : च्या कार्यक्रमादरम्यान शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील तुटलेल्या आठ खुर्चांची चिपळूण पालिकेने दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीसाठी तिन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांची अनामत रक्कम जप्त करून त्यातून हा खर्चकरण्यात आला.
गतवर्षी चिपळूण पालिकेच्या अखत्यारित असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली. त्यानंतर या केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडून नाटकांसह विविध कार्यक्रमांसाठी हे केंद्र खुले करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक केंद्रात एकाच दिवशी तीन कार्यक्रम पार पडले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी या नाट्यगृहातील ८ खुर्ची मोडल्याचे तसेच अस्वच्छताही झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेने याची जबाबदारी एकाच कार्यक्रमावर न ठेवता तिन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांची प्रत्येकी पाच हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त करून त्यातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या मोडलेल्या आठ खुर्चांची दुरुस्ती करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 20/Sep/2024
What's Your Reaction?