कोळकेवाडी धरणपातळीबाबत तज्ज्ञ समिती नेमा ; आकाश लिगाडे

May 28, 2024 - 14:18
 0
कोळकेवाडी धरणपातळीबाबत तज्ज्ञ समिती नेमा ; आकाश लिगाडे

चिपळूण : चिपळूण आणि गुहागर तालुक्याची नैसर्गिक आपली व्यवस्थापन बैठक शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आकाश लिगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोळकेवाडी धरण व्यवस्थापन महाजनकोच्या अधीक्षक पूर परिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत संभाव्य अतिवृष्टी व पूर कालावधीत कोळकेवाडी धरणाची पातळी शक्यतोवर १३२.५ मी. किंवा त्यापेक्षा खाली ठेवण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत २००५ व २०२९ च्या पूरपरिस्थितीची माहिती पॉवरपॉइंटद्वारे उपस्थितांना देण्यात आली. आपत्तीवेळी करावयाच्या उपायोजना, घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महामार्गावरील सर्व गटारांची तत्काळ सफाई करावी, परशुराम घाट २४ तास निगराणीखाली ठेवणे, कुंभालों घाटामध्येही दरडप्रवण क्षेत्राचे ठिकाणी फलक लावून आवश्यक यंत्रसामुग्री २४ तास उपलब्ध ठेवण, नगर पालिका हद्दीतील सर्व नाले, गटारांची स्वच्छता, शहरातील धोकादायक झाडांची कटाई, आरोग्य विभागाने त्यांच्याकडील पुरेसा व आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे, धरणांच्या ठिकाणी २४ तास कर्मचारी ठेवणे, तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला असून ०२३५५-२५२०४४ व ९६७३२५२०४४ असा असून तो सर्वांना देण्याबाबत सूचना दिल्या.

पालिकेने त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक विविध ठिकाणी प्रसिद्ध केले आहेत, त्याप्रमाणे ग्रामपंचायतींनी प्रसिद्ध करावेत. ग्रामपातळीवरील आपत्तीविषयक बैठका घेण्यात याव्यात. आपत्तीकाळात
निवाराकेंद्राची माहिती जनतेला देऊन आपत्तीग्रस्त भागातील जनतेची माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवकांनी संकलित कराव्यात. आपत्तीकाळात कटर, जेसीबी, डंपर, पोकलेन, अॅब्युलन्स यांची तालुकानिहाय मोबाईल नंबरसह यादी करणेच्या सूचना देऊन डिझेल/ पेट्रोल साठाही कायमस्वरूपी राहील याची दक्षता घ्यावी. शासनाने पब्लिक अॅड्रेससिस्टीम सर्व महत्वाच्या ठिकाणी तसेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बसवलेली असून त्या द्वारे सर्व प्रकारची माहिती देण्यात येत आहे. सर्व तलाठी, ग्रामसेवक यांनी कार्यक्षेत्रातील दैनंदिन घडणाऱ्या घटना तत्काळ कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 28/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow