नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Jul 1, 2024 - 17:27
 0
नागपूर-मडगाव एक्स्प्रेसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : विदर्भातून थेट कोकणात येणाऱ्या नागपूर ते मडगाव या विशेष एक्स्प्रेस रेल्वे गाडीच्या फेऱ्या २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने या गाडीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत.

नागपूर ते मडगाव या मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून विशेष गाडी (०११३९/०११४०) चालवण्यात येत आहे. आधी गर्दीच्या हंगामापुरती ही गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्यांना वेळोवेळी मदत वाढ देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन आता या गाडीच्या फेऱ्यांना पुन्हा २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी जाहीर केल्याप्रमाणे या गाडीचे शेवटची फेरी ३० जून २०२४ रोजी होणार होती.

या बाबत कोकण रेल्वे गेलेल्या माहितीनुसार नागपूर ते मडगाव (०११३९) मार्गावर धावताना ही गाडी दि. २८ सप्टेंबर २०२४ पर्यंत धावेल तर मडगाव ते नागपूर (०११४०) दि. २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत ही गाडी चालवण्यात येणार आहे.

नागपुर-मडगाव विशेष गाडीचे गाडीचे थांबे
वर्धा, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमाळी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow