संगमेश्वर : आंबव पोंक्षे गावचे सरपंच शेखर उकार्डे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

Jun 27, 2024 - 12:53
Jun 27, 2024 - 16:58
 0
संगमेश्वर :  आंबव पोंक्षे गावचे सरपंच शेखर उकार्डे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावचे सरपंच शेखर श्याम उकार्डे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे हा पुरस्कार दिला जातो. 'मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा' या शीर्षकाखाली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार दिला जातो. सावेडी रोड, अहमदनगर येथे माऊली संकुल सभागृहात १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या हस्ते व यादवराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्यायहक्कासाठी कार्यरत असलेल्या या संगमेश्वर तालुक्यातील संस्थेचा हा पुरस्कार विशेष मानला जातो. सरपंच शेखर उकार्डे यांना त्यांच्या कार्यात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची साथ मिळत आहे. उकार्डे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:22 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow