रत्नागिरीत फेरीवाल्यांवर अतिक्रमण हटाव मोहिम पथकाची कारवाई सुरू

Jun 28, 2024 - 12:50
Jun 28, 2024 - 12:58
 0
रत्नागिरीत फेरीवाल्यांवर अतिक्रमण हटाव मोहिम पथकाची कारवाई सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर रत्नागिरी नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेने कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी भर पावसात रामआळी, एसटी स्टॅण्ड परिसरातील हातगाड्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होईल, अशा पद्धतीने बसलेल्या नायलॉन दोरी विक्रेत्यावरही दंडात्मक कारवाई केली. रत्नागिरी शहरातील बाजारपेठांच्या ठिकाणी असलेल्या अरुंद रस्त्यांमध्ये अनेक फेरीवाले, फळविक्रेते बसतात. या फळ विक्रेत्या हातगाडीवाल्यांना कुणी जाब विचारला तर त्यांच्याशी उद्धटपणा करतात अशा तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम पथक कार्यरत झाले. अतिक्रमण हटाव मोहिमेत जप्त केलेली आंबे, केळी रिमांड होमला देण्यात आली. हातगाडीसह फळांचे क्रेट, वजन काटे जप्त करण्यात आले. हातगाड्या, काटे, क्रेट, नायलॉन दोऱ्यांचे बंडळ दंड वसूल करून परत दिले जाणार आहेत.

यापुढेही कारवाई सुरूच राहणार
एसटी स्टॅण्ड परिसर, रामआळीत कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या फळ विक्रेत्यांच्या हातगाडीवाल्यांची पळापळ सुरू झाली. भर पावसात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असल्याचे अतिक्रमण हटाव मोहीम पथकाचे प्रमुख नंदकुमार पाटील यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:22 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow