परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला

Jun 21, 2024 - 12:56
 0
परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून कोकणासह राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे. अखेर बहुप्रतीक्षित अशा मान्सूनने राज्यात दमदार एंट्री केली आहे.

अशातच पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) रस्त्यांची परिस्थिती समोर आली आहे. अलिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गावरील संगमेश्वरजवळील संरक्षक भिंतीचं काम खचत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर आता याच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील (Parshuram Ghat) रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे.

अलिकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात मातीचा भराव अक्षरक्ष: वाहून गेलाय. सध्याघडीला या घटणेमुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी, भराव वाहून गेल्याने साईड पट्टीला मोठ्या तडा गेल्या आहेत. परशुराम घाटातील डोंगरातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोकणात सर्वत्र पावसाने एकच दाणादाण केल्याचे चित्र आहे.

मुसळधार पावसाची सर्वत्र दाणादाण

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. अशा स्थितीत पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील दुरावस्था समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्याच्या कडेला टाकलेला भराव खचला असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्यातरी या प्रकारामुळे वाहतुकीला परिणाम झाला नसला तरी पुढे यातून मोठी दुर्घटना निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासना कडून करण्यात आली आहे.

तिलारी घाट 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूकिसाठी बंद

तळकोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तिलारी घाट आजपासून 31 ऑक्टोबर पर्यंत अवजड वाहतूकिसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोडामार्ग ते चंदगडला जोडणाऱ्या तिलारी घाटातील अवजड वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. तिलारी घाटातील जीर्ण संरक्षक कठडे, अवघड वळणांमुळे अपघाताची भीती असल्याने 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चंदगड तालुक्यातील परिते- गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी चंदगड-हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी-भेडशी ते तिलारी घाट मोटर वाहन कायदा 115 आणि 116 अन्वये अमोल येडगे यांनी अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तिलारी घाटातून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खूपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असून घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांचा वळण बसत नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:25 21-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow