चिपळुणात लेखापरीक्षकांसाठी प्रशिक्षण

Jul 1, 2024 - 11:27
Jul 1, 2024 - 14:30
 0
चिपळुणात लेखापरीक्षकांसाठी प्रशिक्षण

दाभोळ : महाराष्ट्र शासनाच्या बदलत्या लेखापरीक्षण निकषांचा अभ्यास करून प्रमाणित लेखापरीक्षकांनी पारदर्शक लेखापरीक्षण करणे ही लेखा परीक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोपान शिंदे यांनी चिपळूण येथे केले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व दि कराड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्र कराड यांच्या संयुक्त सहकायनि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण झाले. डॉ. सोपान शिंदे यांनी विविध कार्यकारी सेवा संस्था, सेवक व नागरी सहकारी पतसंस्था व सह‌कारी गृहनिर्माण संस्था यांचे लेखापरीक्षण करताना झालेले बदल, लेखापरीक्षण पूर्व तयारी, लेखापरीक्षण करताना घ्यावयाची दक्षता, सहकारी संस्थांचे वाढीसाठी करावयाचे प्रयत्न याबाबत मार्गदर्शन केले, अॅड, महेंद्र खरात यांनी इंडीयन पिनल कोडमधील कायदेशीर तरतुदी, फौजदारी प्रक्रिया, लेखापरीक्षण अहवालातील अ, ब, व क या विभागात कोणते मुद्दे असतात याबाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचा लाभ सुमारे ४० प्रमाणित लेखापरीक्षकांनी घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow