खेड : गुणदे ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या प्रसारासाठी पुढाकार

Jun 28, 2024 - 13:31
Jun 28, 2024 - 15:45
 0
खेड : गुणदे ग्रामपंचायतीचा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या प्रसारासाठी पुढाकार

लोटे : खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. ग्रामपंचायत कार्यकारिणीसह ग्रामस्थ महिलांनी घरोघरी जाऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा प्रचार व प्रसार केला. ग्रामपंचायत गुणदेचे सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच संध्या कांदेकर, ग्राम विकास अधिकारी आरती मोरे, ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली गावात नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम आणि विकास कामे केली जात असतात. या उपक्रमांबरोबरच माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचा प्रसार आणि प्रचार गावातील महिलांनी केला. यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कार्यकारिणीचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:00 PM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow