संगमेश्वर : कुडवली बौद्धवाडीतील साकव बनलाय धोकादायक

Jul 1, 2024 - 11:23
 0
संगमेश्वर : कुडवली बौद्धवाडीतील साकव बनलाय धोकादायक

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील कुडवली बौद्धवाडी येथील लोखंडी साकवाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना आपला जीव मुठीत घेऊन या साकवावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

कुडवली बौद्धवाडी येथील सप्तलिंगी नदीवरील लोखंडी साकव पुढे साडवली एमआयडीसी व कोसुंब या दोन ठिकाणी जोडतो. सद्यस्थितीत हा साकव धोकादायक बनला आहे. ग्रामस्थांनी या मार्गांवरून प्रवास करणे थांबवले असले तरी कोसुंब हायस्कूल येथे जाण्यासाठी पर्यायी जवळचा मार्ग नसल्याने कुडवली बौद्धवाडीतील विद्यार्थ्यांना रोज या साकवावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

या साकवाची योग्य प्रकारे दुरुस्ती न झाल्याने याची सध्या दयनीय अवस्था बनली आहे. संभाव्य वादळी व मुसळधार पावसात हा साकव सहज वाहून जाऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेत संबंधित यंत्रणेसह लोकप्रतिनिधिंनी याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow