आंबा घाटात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

Jul 1, 2024 - 11:24
 0
आंबा घाटात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटातील विसावा स्पॉट जवळच्या दरीत अनोळखी पुरुषचा मृतदेह आढळला. देवरूख पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. 

ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनास आली. सध्या पावसाळा सुरू असून अनेक पर्यटक आंबा घाटात येत असून पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. असाच फोटो काढत असताना एकाला दरीत मृतदेह दिसला. याबाबत पर्यटकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी साडेचार वाजता साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. या अनोळखीचे वय अंदाजे ४५ ते ५० आहे. उंची पाच फूट आठ इंच, सडपातळ बांधा, त्याच्या उजव्या हाताच्या आतील बाजूला आशा असे नाव गोंदलेले आहे. अंगात पिवळसर फिक्कट रंगाचा नक्षी असलेला फुल शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow