चिपळुणात जूनअखेर सरासरी १,०२८ मि.मी. पावसाची नोंद

Jul 1, 2024 - 11:33
Jul 1, 2024 - 11:39
 0
चिपळुणात जूनअखेर सरासरी १,०२८ मि.मी. पावसाची नोंद

चिपळूण : चिपळूण तालुक्यात दि. १ ते ३० जून या कालावधीत सरासरी १,०२८ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी याच कालावधीत ४२९.१० मि.मी. पाऊस झाला होता. सुमारे ६०० मि.मी. पाऊस गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाला असून, शेतकऱ्यांनी भात लावणीला जोर केला आहे.

चिपळूण तालुका परिसरात नऊ मंडल विभागात जून महिन्याच्या कालावधीत १ हजार २८ मि.मी. पाऊस झाला आहे. दि. ३० जून रोजी सुमारे २७.३० मि.मी. तर गतवर्षी ३० जून २०२३ रोजी ९१.६० मि.मी पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी चोवीस तासांत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ६० मि.मी. पाऊस कमी झाला असला तरी महिनाभरातील पावसाची तुलना करता गतवर्षी ४२९ जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस मंडणगड तालुक्यात झाला असून ७२७.६० मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी मंडणगड तालुक्यात जूनअखेर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ५३१.८० मि.मी. इतका झाला होता. तर यावर्षी १०२८ असा सुमारे ६०० मि.मी. जादा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस यावर्षी चिपळूणमध्ये पडल्याची नोंद करण्यात आली आहे. पावसाने जून महिन्यात सुरुवातीपासूनच सातत्य राखल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

भात लावणीच्या कामांना वेग
समाधानकारक पाऊस पडल्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. तालुका परिसरात सुमारे साठ टक्क्यांहून अधिक भातशेतीची कामे पूर्ण झाली आहेत. पाणथळ जागी भातलावणी जवळपास पूर्ण होत आली आहे. महान व हळव्या पिकाला या पावसाचा चांगला फायदा होणार आहे. तसेच लावणी पूर्ण झाल्यानंतर पावसाने असेच सातत्य राखल्यास यंदा भातशेती व अन्य पिकांचे उत्पादन चांगले येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow