लांजा : खोरनिनको रस्त्यावरील भगदाड तात्पुरते बुजवले

Jul 1, 2024 - 12:17
 0
लांजा :  खोरनिनको रस्त्यावरील भगदाड तात्पुरते बुजवले

लांजा : तालुक्यातील खोरनिनको रस्त्यावर पडलेले भलेमोठे भगदाड सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बुजवून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली; मात्र घाईगडबडीत करण्यात आलेली ही तात्पुरती मलमपट्टी असून यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

खोरनिनको मार्गावरील लक्ष्मीमंदिर ते चौगुले दुकानादरम्यान वहाळावर असलेली मोरी ही शुक्रवारी पडलेल्या प्रचंड पावसात दुपारी दीडच्या सुमारास खचली आणि मोरीच्या ठिकाणी रस्त्यावर मोठे भगवाड पडले होते. त्यानंतर त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. एसटीसह सर्वच वाहतूक व्यवस्था कोलमडून गेल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत याठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून भगदाड बुजवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे; विभागाने तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow