राजापूर : कुणबी दाखल्यांचे मंडळनिहाय वाटप करण्याची समाजोन्नती संघाची मागणी

Jun 14, 2024 - 11:27
Jun 14, 2024 - 13:33
 0
राजापूर : कुणबी दाखल्यांचे मंडळनिहाय वाटप करण्याची  समाजोन्नती  संघाची मागणी

राजापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राजापूर तालुका अभिलेख नोंद पडताळणीमध्ये आढळून आलेल्या कुणबी जात नोंदींच्या दाखल्यांचे मंडळनिहाय वाटप करण्याची मागणी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा राजापूरच्या वतीने केली आहे. याचाबतचे निवेदन दीपक नागले यांच्यासह पदाधिकारी आणि कुणबी समाजबांधवांनी तहसीलदार शीतल जाधव यांना दिले.

या वेळी सचिव चंद्रकांत जानस्कर, खजिनदार जितेंद्र पाटकर, कार्यकारिणी सदस्य वसंत आंबेतकर, संतोष हातणकर, मानसी दिवटे, श्रीकांत राघव, सुरेश बाईत, अशोक तांबे, संतोष कुल्ये, सुनील शिवगण आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून अभिलेख तपासणी करण्यात आली होती. जिल्हाभरामध्ये सुमारे ३ लाख ५६ हजार ८०६ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे १ लाख १२ हजार ८६ नोंदींचा समावेश आहे, अभिलेख तपासणीमध्ये आढळलेल्या कुणबी नोंदीमुळे गेली अनेक वर्ष जातीच्या पुराव्यापासून कोकणातील वंचित राहिलेल्या बांधवांना दिलासा मिळाला आहे. जातपडताळणीसाठी १९६७ पूर्वीचा जातीच्या नोंदीचा पुरावा जोडावा लागतो. हा पुरावा मिळवताना संबंधितांची दमछाक होते. त्यामुळे कुणबी जात नोंदीचे दाखले शिबिरांचे आयोजन करून मंडळनिहाय मिळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow