लांजा बस स्थानकात नव्याने निवारा शेड उभारण्याची मागणी

Jul 1, 2024 - 12:59
Jul 1, 2024 - 14:05
 0
लांजा बस स्थानकात नव्याने निवारा शेड उभारण्याची मागणी

लांजा : लांजा बस स्थानकात प्रवासी निवारा शेडची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. पावसाळ्यात छत्री उघडून ताटकळत एसटीची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे नव्याने या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी सध्या असलेली निवारा शेड प्रवाशांच्या दृष्टीने पुरेशी ठरत नाही. विशेषतः पावसाळ्यात ग्रामस्थांबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय होते. या ठिकाणी प्राथमिक शाळा, लांजा हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी येत असतात.

यासाठी बसस्थानकात माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून प्रवासी निवारा शेड बांधण्यात आली होती. मात्र, काँक्रिटीकरणावेळी ही निवारा शेड तोडण्यात आली. मात्र, त्यानंतर ही निवारा शेड बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या शेकडो विद्यार्थी आणि प्रवाशांना पावसात छत्री उघडून, ताटकळत उभे राहून एसटीची वाट पाहावी लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पूर्वीप्रमाणे या ठिकाणी प्रवासी शेड बांधावी, अशी मागणी केली जात आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow