मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; रोहित शर्माच्या आईची भावनिक पोस्ट..

Jul 1, 2024 - 14:29
 0
मुलगी खांद्यावर, देश पाठीशी आणि बाजूला भाऊ; रोहित शर्माच्या आईची भावनिक पोस्ट..

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा किताब जिंकला. २०१३ पासून भारताला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण, टीम इंडियाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

या विजयानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. भारताने सामना जिंकताच कर्णधार रोहित शर्मासह सर्वच खेळाडू भावुक दिसले. आता रोहितची आई पूर्णिमा शर्मा यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.

रोहितच्या आईने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहित, विराट आणि त्यांची नात अर्थात रोहितची मुलगी समायरा पाहायला मिळत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये म्हटले आहे की, मुलगी खांद्यावर... संपूर्ण देश पाठीशी... आणि भाऊ बाजूला आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. अष्टपैलू रवींद्र जडेजाही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्त झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow