राजापुर : सागवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मर्याबी बोरकर यांची नियुक्ती

Jul 1, 2024 - 11:01
Jul 1, 2024 - 16:41
 0
राजापुर :  सागवे  ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदी मर्याबी बोरकर यांची  नियुक्ती

राजापूर : राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सागवेच्या उपसरपंचपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या मर्याबी अ. रज्जाक बोरकर यांची निवड झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे.

आज सागवे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या निवडणुकीत सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी एम. बी. नवरे तर अध्यासी अधिकारी सरपंच सोनाली वसंत ठुकरुल यांनी काम पाहिले. उपसरपंपदी नियुक्त झालेले मंगेश गुरव यांच्या रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच सोनाली ठुकरूल, माजी सरपंच जुनेद मुल्ला, सदस्य कृष्णकांत मोंडे, माजी उपसरपंच तथा शिवसेना शाखाप्रमुख मंगेश गुरव, मसूद शेख, मधुकर जोशी, संदेश बोटले, अब्दुल रज्जाक अ. लतिफ बोरकर, अनुष्का राणे, नीलाक्षी येराम, योगिता नाकटे, रजिया बगदादी, परवीन बोरकर, साक्षी माजरेकर, सम्पदा संतोष नार्वेकर आदी उपस्थित होते. नूतन उपसरपंच श्रीमती बोरकर यांचे सरपंच सोनाली ठुकरुल, ग्रामविकास अधिकारी नवरे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:01 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow