लांजात महावितरणकडून वीजखांब, विद्युत वाहिनीचे सर्वेक्षण

Jul 1, 2024 - 14:36
Jul 1, 2024 - 16:41
 0
लांजात महावितरणकडून वीजखांब,  विद्युत  वाहिनीचे सर्वेक्षण

लांजा : लांजा शहरातील सातत्याने खंडित होण्याऱ्या वीजपुरवठा समस्येवर आमदार राजन साळवी यांच्या सूचनेनुसार महावितरणचे कार्यकारी उपअभियंता आणि शिवसेना शहर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ११ के. व्ही. ची विद्युत वाहिनी आणि २० खांब यांचे गुरुवारी सर्वेक्षण करण्यात आले.

लांजा शहर आणि तालुक्यात वीज पुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर आमदार राजन साळवी यांनी मंगळवारी शिवसेना पदाधिकारी यांना घेऊन लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली होती.

आमदार राजन साळवी यांनी उपअभियंता यांना लांजा शहर फिडर आणि ११ के. व्ही. नवीन लाईन तातडीनं काम हाती घेण्यास सुचवले होते. त्यानुसार लांजा महावितरण उपकार्यकारी अभियंता दयानंद आसष्टेकर, लाईनमन प्रवीण शिवगण, प्रथमेश साळवी, लांजा शहर प्रमुख नागेश कुरूप, नगरसेवक राजू हळदणकर, आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक मयुरेश भट, महेश नागले यांनी आय टी आय लांजा ते शहनाई हॉल दरम्यान सर्वेक्षण करून २० पोलची नवीन लाईन जोडणीकरिता प्रत्यक्ष पाहणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:03 PM 01/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow