देवरूखला आजपासून नियमित पाणीपुरवठा

Jun 11, 2024 - 10:49
 0
देवरूखला आजपासून नियमित पाणीपुरवठा

देवरुख : पाऊस सुरू झाल्याने शहराचा नळ पाणीपुरवठा मंगळवार, दि. ११ पासून नियमित केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दिली आहे. यापूर्वी शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने ११ एप्रिलपासून शहराला एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात होता. यामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली होती. मात्र, हा पाणीपुरवठा कायम ठेऊन नागरिकांना दिलासा दिला होता, अन्यथा देवरुखवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागली असती. दोन दिवसांपूर्वी पाऊस सुरू झाल्याने पाणी साठवणाऱ्या धरणात पाण्याची वाढ झाली आहे. यामुळेच एक दिवसआड पाणी पुरवण्याचा निर्णय बदलून ११ पासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow