खेड नगरपालिकेची धोकादायक बांधकाम असणाऱ्या ७३ जणांना नोटीस

Jul 2, 2024 - 10:54
 0
खेड नगरपालिकेची धोकादायक बांधकाम असणाऱ्या ७३ जणांना नोटीस

खेड : शहरातील महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी खासगी चाळीचा काही भाग मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरप्रशासनाने यापूर्वीच शहरातील धोकादायक बांधकाम असणाऱ्यांना ७३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन धोकादायक ठिकाणांचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्यादृष्टीने प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्जता ठेवली आहे. महाडनाका येथील खासगी रिकामी चाळ कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; मात्र महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी चाळ खाली करण्यासाठी संबंधित मालकास पालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली होती तसेच शहरातील विविध भागातील धोकादायक बांधकाम असणाऱ्या ७३ जणांनाही नोटीस बजावल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow