चिपळूण : साडेआठ लाखांची विज चोरी; दोघांवर गुन्हा

Jul 2, 2024 - 14:15
 0
चिपळूण : साडेआठ लाखांची विज चोरी; दोघांवर गुन्हा

चिपळूण : सतरा महिन्यांपासून चोरीची वीज वापरुन महावितरण कंपनीचे 8.56 लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी तालुक्यातील तनाळी येथील रमेश कृष्णाजी वैद्य व सहदेव विष्णू चव्हाण (दोघे-तनाळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना सोमवारी चिपळूण पोलीस स्थानकात घडली. 

ही घटना तनाळी येथे घडली आहे. याबाबतची फिर्याद विजय राजेश धरमसारे (31, उप-कार्यकारी अभियंता, भरारी पथक, पेण) यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश वैद्य व सहदेव चव्हाण यांनी अनधिकृतपणे 23 नोव्हेंबर 2022 ते 23 एप्रिल 2024 या 17 महिन्याच्या कालाधीत 47962 युनिट्स वीज चोरुन वापरली. यातून 8 लाख 56 हजार 360 रुपयांची वीज चोरी करुन महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी विजय धरमसारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्य व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:40 02-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow