खेडमध्ये अतिवृष्टीमुळे ५ लाख ४५ हजारांचं नुकसान

Jul 2, 2024 - 14:27
Jul 2, 2024 - 14:31
 0
खेडमध्ये अतिवृष्टीमुळे ५ लाख ४५ हजारांचं नुकसान

खेड : तालुक्यात गेल्या महिन्याभरात पावसाने गतवर्षी पेक्षा सरासरी दुप्पट गाठली आहे. एका महिन्यात ९१९.७० मिलिमीटर नोंद झाली असून गेल्यावर्षी जून महिन्यात एकूण ५५८.३० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली होती.

आपत्ती नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात ५ लाख ४५ हजारांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामध्ये घरांसह गोठ्यांच्या पडझडीचा समावेश असून महसूलकडून पंचनाम्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील सोनगाव भोईवाडी येथील दिलीप दिवेकर व पुष्पा महादेव पारधी यांची घरे जमीनदोस्त होवून १ लाख ३७ हजार रूपयांच्या नुकसानीची नोंद झाली आहे. खोपी 'रामजीवाडी येथील विठ्ठल बाळू बर्गे यांच्या घराचे तीन हजार रूपये अंशतः नुकसान झाले. तुळशी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे २५ हजार रूपये, नांदिवली येथील काशिनाथ गणपत कदम यांच्या घराचे १६ हजार ८०० रू. व मांडवे येथील लक्ष्मण भागोजी डोईफोडे यांच्या गुरांच्या गोठ्याचे १७ हजार रूपयांचे नुकसान झाले. कसबा नातू येथील काशिराम चंद्रकांत रांगडे यांच्या घराचे पाच हजार रूपये, घाणेखुंट जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे १० हजार रूपये, खाडीपट्ट्यातील राजवेल साई मंदिराच्या संरक्षक भिंतीचे २० हजार रूपयांचे नुकसान झाले. पुरे खुर्द येथील अनंत परशुराम जाधव यांच्या गुरांच्या गोठ्याचे १८ हजार ५०० रूपये, शिंगरी येथील तेजश्री तुळशीराम चव्हाण यांच्या घराचे १३ हजार ६६५ रूपयांची हानी झाली. दहिवली नळपाणी योजनेची साठवण टाकी कोसळून ५५ हजार रूपये, खाडीपट्ट्यातील कर्जी येथील रामचंद्र बाबू लोंढे यांच्या गुरांच्या गोठ्याचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 02/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow