राजापुर : 'बाजारात जाऊन येते' सांगून गेलेली महिला बेपत्ता

Jul 3, 2024 - 10:23
 0
राजापुर : 'बाजारात जाऊन येते' सांगून गेलेली महिला बेपत्ता

राजापूर : बाजारात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडलेली शहरातील बंगलवाडी येथील स्वरा सचिन धुरी (२८) ही दि. २ जून २०२४ पासून बेपत्ता असून राजापूर पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली आहे. 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर शहर बंगलवादिमधील स्वरा सचिन धुरी ही दि. २ जून २०२४ ला बाजारात जाते, असे सांगून बाहेर पडली होती. मात्र, नंतर ती घरी परतली नव्हती. तिच्या घरच्यांनी इतरत्र शोधाशोध घेतली असताती सापडली नव्हती. अखेर स्वराचे पती सचिन नंदकुमार धुरी यांनी राजापूर पोलिस ठाण्यात नोंद केली. या बाबत राजापूर पोलिस ठाण्याचे हेड कॉ. अनंत तिवरेकर हे अधिक तपास करीत असून सदर महिला कुठे आढळून आल्यास राजापूर पोलीस ठाणे (०२३५३-२२२०३३) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राजापूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अनंत तिवडेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow