लाडकी बहीण योजना: जन्म, अधिवास दाखल्याची अट रद्द करा; ना. उदय सामंत यांची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

Jul 3, 2024 - 11:03
Jul 3, 2024 - 11:08
 0
लाडकी बहीण योजना: जन्म, अधिवास दाखल्याची अट रद्द करा; ना. उदय सामंत यांची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत घालण्यात आलेल्या काही अटीशर्तीमुळे अडचणी येतात. त्यासाठी जन्मदाखला, अधिवास दाखला ही अट रद करा. अर्जदार महिलांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्डवर लाभ दिला जावा आणि या वर्षामध्ये विविध कामासाठी काढण्यात आलेले उत्पत्र दाखला त्यासाठी ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात सध्या माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अनेक महिला अर्ज करण्याच्या गडबडीत आहेत. काही अटीमुळे अर्ज भरताना गैरसोय होत आहे. या योजनेच्या अटीशर्तीमध्ये बदल केला नाही तर अनेक महिला लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब मजगांव सरपंच फैयाज मुकादम यांनी पालकमंत्री उदय सामंत व सिंधूरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांना निवेदनाद्वारे दाखवून दिली. या अटीमध्ये बदल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला याचा लाभ होणार आहे. किरण सामंत यांनी ही गोष्ट पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिली. या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी अटीशर्तीमध्ये बदल करून तसे आदेश प्रशासनाला द्यावे, असे पत्र उद्योगमंत्री सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 03/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow