धामणसे येथे 'मन की बात' कार्यक्रमावेळी महिला, शेतकऱ्यांना प्लास्टिक खोळचे वितरण

Jul 1, 2024 - 09:57
Jul 1, 2024 - 10:02
 0
धामणसे येथे 'मन की बात' कार्यक्रमावेळी महिला, शेतकऱ्यांना प्लास्टिक खोळचे वितरण

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीच्या तिसऱ्या काळातील पहिला मन की बात कार्यक्रम रविवारी ३० जून रोजी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथे प्रक्षेपित करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, जवळपास १५० ग्रामस्थांची हजेरी होती. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, सीआरपी, बचत गट सदस्य, आशा सेविकाही उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये तिसऱ्यांदा भाजपा सरकार स्थापन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारली आणि विकासकामांना सुरवात केली. 'मन की बात'चा हा १११ वा भाग होता. नव्या सरकारचा पहिला कार्यक्रम धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या डी. एम. जोशी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरण सादर झाला. विशेषतः शेतीची कामे सुरू असूनही महिला, पुरुष, शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

रत्नागिरी खरेदी- विक्री संघाचा संचालिका सौ. ऋतुजा उमेश कुलकर्णी, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, सरपंच अमर रहाटे, उपसरपंच अनंत जाधव, ग्रामपंचायत सदस्य सौ. वैष्णवी धनावडे, सौ. रेश्मा डाफळे, अनघा जाधव, अविनाश लोगडे, विनायक भुवड आदी प्रमुख उपस्थित होते. 

धामणसे गावातही विविध उपक्रम, सरकारी योजनांचा लाभ देण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भाजपाचे पदाधिकारी उमेश कुळकर्णी यांनी स्पष्ट केले.

या मन की बात या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेश दिला की, आईच्या नावाने एक तरी झाड लावा. या संदेशावर तत्काळ विचार करून सरपंच अमर रहाटे व उपसरपंच अनंत जाधव यांनी या उपक्रमाचा शुभारंभ धामणसे गावातून लवकरात लवकर करण्याचा मानस व्यक्त केला.

खोळचे वाटप
याप्रसंगी बचत गटातील महिला, ग्रामस्थांना उपयुक्त अशा पावसाळी खोळचे वाटप करण्यात आले. बऱ्याचदा शेतकरी शेतात भिजतो, स्वतःच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतो. म्हणून पावसापाण्यात शेतकरी न भिजता कार्यरत राहावा याकरिता छोटीशी पण उपयुक्त भेट म्हणून प्लास्टिकची खोळ देण्याचे ठरवले. यात दीडशे महिलांना प्लास्टिकची खोळ देण्यात आली. शेतकरी सन्मान योजनेच्या प्राप्त १७ व्या अनुदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले. तसेच लेक लाडकी महाराष्ट्राची या राज्य सरकारच्या योजनेचीही माहिती देण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow