Ratnagiri : शाळाबाह्य मुलांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर

Jul 3, 2024 - 17:26
 0
Ratnagiri : शाळाबाह्य मुलांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर

◼️ जिल्ह्यात ५ ते २० जुलै या कालावधीत होणार सर्वेक्षण 

रत्नागिरी : शाळाबाह्य अनियमित स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ जुलै ते २० जुलै या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामुळे शाळाबाह्य मुलांवर शिक्षण विभागाची आता करडी नजर असणार आहे.

बालकांचा मोफत व स्त्रीच्या शिक्षणाचा अधिकार व अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आले. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. कामानिमित मोठ्या प्रमाणावर कुटुंचाचे स्थलांतर होते, त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलांचे शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. अशा शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रसाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अमाच्नि राखण्यासानी दिनांक ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीत सर्वेक्षण करावयाचे आहे. ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीमध्ये केले जाणार असून ३ ते ६ वयोगटाची जबाबदारी महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी तर ६ ते १४ वयोगटाची जबाबदारी शिक्षणअधिकारी प्राथमिक आणि १४ ने १८ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आली आहे.

शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी होण्याकरिता तालुकास्तरावर, स्तर समिती, केंद्र व गावस्तर समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. राज्याच्या या महत्तवपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकस, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी सिंह व सह अध्यक्ष सीईओ किर्तीकरण पूजार व समिती सदस्य तसेच सदस्य, सचिव यांच्या उपस्थितीत पार पड़ाली, या सभेमध्ये शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील समितीचे आवाहन
जिल्ह्यातील ६ ते १८ वयोगटातील सर्व मुले शाळेच्या नियमित प्रवाहात दाखल करून एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी अध्यक्ष व सह अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती यांनी आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow