र.ए.सोसायटीच्या 'गुरुकुल' च्या विद्यार्थ्यांनी कसोप येथे घेतला भात लावणीचा अनुभव

Jul 3, 2024 - 17:21
 0
र.ए.सोसायटीच्या 'गुरुकुल' च्या विद्यार्थ्यांनी कसोप येथे घेतला भात लावणीचा अनुभव

रत्नागिरी : आपल्या कोकणी माणसांच्या जेवणातील मुख्य अन्न आणि पूर्णान्न म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे भात. हेच अन्न कशाप्रकारे पिकवले जाते हे आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोकणात पावसाळ्यात या भाताची लावणी म्हणजेच लागवड केली जाते. तांदूळ पिकवण्यासाठी शेतकरी लोक किती कष्ट करतात हे प्रत्यक्षात आपण कष्ट केल्याशिवाय समजत नाही. हेच शेतकऱ्यांचे कष्ट लक्षात यावेत यासाठी र.ए.सोसायटीच्या कै.बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत भात लावणी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. 

यावर्षी इयत्ता ७ वी  विद्यार्थ्यांनी कसोप येथे भात लावणी हा उपक्रम, गुरुकुल शिक्षक व स्थानिक शेतकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. या उपक्रमातून विद्यार्थी नियोजनबध्द लावणी कशी करावी ? तसेच आपण रोज जेवत असलेल्या अन्नाला किती महत्त्व आहे ? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या भात लावणी साठी कसोप येथील श्री व सौ पूनस्कर व कुटुंबीय यांचे विशेष सहकार्य लाभले.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांसोबत मयूर कुलकर्णी आणि श्रीम.श्रद्धा टिकेकर हे शिक्षक होते. संपूर्ण उपक्रम गुरुकुल प्रमुख नितीन लिमये यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जी. जी. पी. एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर तसेच र. ए. सोसायटीचे पदाधिकारी यांचे सहकार्याने पार पडला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow