डॉक्टर इंजीनियरिंग बरोबर अन्य क्षेत्रातही करिअरचा संधी : डॉ. चेतन औरंगाबादकर

Jul 3, 2024 - 17:36
 0
डॉक्टर इंजीनियरिंग बरोबर अन्य क्षेत्रातही करिअरचा संधी : डॉ. चेतन औरंगाबादकर

◼️ फाटक हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी : 'डॉक्टर इंजिनिअरिंग बरोबरच अन्य क्षेत्रातही करिअरच्या खूप मोठ्या संधी असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यायाम, खेळ आणि छंद जोपासायला हवा.' असे प्रतिपादन रत्नागिरीतील प्रतिथयश डॉक्टर श्री. चेतन औरंगाबादकर यांनी केले औचित होते फाटक हायस्कूल व गांगण- केळकर कनिष्ठ महाविद्यालयातील गुणगौरव समारंभाचे.

दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या फाटक हायस्कूल व श्रीमान वि.स. गांगण कला वाणिज्य व कै. त्रि.प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इ.१०वी, १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्री. बाबासाहेब परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर श्री. चेतन औरंगाबादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश सोहोनी तसेच अडॅ श्री. विनय आंबुलकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा अडॅ.सौ. सुमिता भावे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजन कीर, उपमुख्याध्यापक श्री. विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका सौ. नेहा शेट्ये आदि मान्यवरांच्या उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागत गीताने आणि ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापकांनी शाळेच्या यशाचा उंचावलेला आलेख प्रस्ताविकातून मांडला. तर संस्थेचे सचिव श्री. दिलीप भातडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. १०वी, १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध देणगीदारांनी संस्थेकडे ठेवलेल्या देणगीच्या व्याजातून प्रतिवर्षी रोख रकमांचे बक्षीस दिले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकडून भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. एस एस सी परीक्षेचा निकाल 99.53% लागला असून कु. सई अवसरे 99.40 % कु. विणा काळे 98.45% कु. मिहिका परांजपे 97.80% यांनी अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले तसेच एच एस सी परीक्षेत कला शाखेत कु. प्रतिक मोहित 66.33%, कु. सुजल कांबळे 65.83% , कु. सेजल जाधव 65.83% यांनी तर वाणिज्य शाखेत कु. अनुश्री रसाळ 88.17%, कु. सृष्टी नार्वेकर 87.17%कु. मानस जोशी 81.40% आणि विज्ञान शाखेत कु. साकार अंबुरे 90.67%, कु. ऋचा करमरकर 90.17 %, कु. अथर्व डोंगरे 89.50% यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विषयांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचेही कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बारावी विज्ञान शाखेतील कु. अनुष्का करमरकर कु. केपुर कुलकर्णी यांनी संस्कृत विषयात 100 गुण मिळवल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.

विषय अध्यापनातील उल्लेखनीय यशाबद्दल श्री. अजित चवेकर, सौ. नेहा शेट्ये, श्री. राजाराम पानगले, सौ. मंजिरी आगाशे श्री. दिनेश नाचणकर श्री. अनंत जाधव या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यां मनोगतातून शाळा व शिक्षकांचे आभार मानले. पालक श्री. कोतवडेकर यांनी विद्यार्थ्यांना मल्टीस्किल बनण्याचा संदेश दिला. मराठीची अस्मिता आणि मराठी शाळा टिकली पाहिजे असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. सौ. मंजिरी आगाशे आगाशे, श्री. विलास पांचाळ या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेतानाच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळा पुढील 25 वर्षाचे नियोजन करत असल्याचे उपाध्यक्ष अ०डॅ.श्री विनय आंबुलकर यांनी मनोगतातून सांगितले. अध्यक्ष अ०डॅ. बाबासाहेब परुळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे तसेच पालकांचे कौतुक केले. गुणगौरव समारंभाचे सूत्रसंचालन सौ. नेहा म्हाबदी, सौ. आरती पाथरे आणि श्री. रमेश काटकर यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका सौ. नेहा शेट्ये यांनी मानले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 03-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow