बॉम्बस्फोटातील मृतांच्या वारसांना संपर्काचे आवाहन

May 29, 2024 - 11:59
 0
बॉम्बस्फोटातील मृतांच्या वारसांना संपर्काचे आवाहन

रत्नागिरी : जातीय दंगली, बॉम्बस्फोटात १९९२-९३ मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रलंबित आर्थिक मदत देण्यासाठी त्यांच्या वारसांनी एक महिन्याच्या आत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर, रूम नं. १०३, पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१, हेल्पलाईन क्र. ०२२-२२६६४२३३ अथवा नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, १०वा मजला, शासकीय वसाहत, चेतना कॉलेजसमोर, वांद्रे (पु), मुंबई ४०००५१ अथवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधी व सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिवांकडून करण्यात आले आहे. तसेच नजिर दाऊद लांबे (पो. सैतवडे, जि. रत्नागिरी), राजू तनु कपले (शिरवाने, ता. दापोली, जि. रत्नागिरी), मुजीब इब्राहिम मोडक (पो. कडवई, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या मृतांच्या वारसांनी वरील पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 29-05-2024
 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow