मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणाऱ्या डीव्हीपी इन्फ्राला 1 कोटी 88 लाखाचा दंड

Jul 5, 2024 - 12:48
 0
मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणाऱ्या डीव्हीपी इन्फ्राला 1 कोटी 88 लाखाचा दंड

रत्नागिरी : मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणाऱ्या डीव्हीपी इन्फ्रा ठेकेदार कंपनीला १ कोटी ८८ लाखाचा दंड ठोठावूनही बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरू आहे.

बंधाऱ्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते; मात्र अजूनही पांढरा समुद्र ते जयहिंद चौकपर्यंतच्या १२०० मीटरचे काम रखडले आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना उधाणाचे पाणी वस्तीत शिरण्याची भिती आहे.


मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम व्हावे, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. राज्य सरकारने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सुमारे ३ हजार १५० मीटरचा हा बंधारा आहे. या बंधाऱ्याचे काम डीव्हीपी इन्फ्रा ही ठेकेदार कंपनी करत आहे. सुरवातीपासूनच मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम संथगतीने सुरू झाले. प्रत्यक्षात कामाला मुहूर्तच मिळत नव्हता. ग्रामस्थांना बंधाऱ्याचे काम सुरू करण्यासाठी आंदोलने करावी लागली. बंधाऱ्याचे काम रखडल्यामुळे डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला प्रत्येक टप्प्यावर दंडही ठोठावण्यात आला. आतापर्यंत चार टप्यांवर डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून १ कोटी ८८ लाख २ हजार रुपयांचा दंड पतन विभागाने वसूल केला आहे.


मिऱ्या धूपप्रतिबंधक बधाऱ्याचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही मिऱ्यावासियांसमोर धोका कायम आहे. ३ हजार १५० मीटर बंधाऱ्यापैकी पहिला बाराशे मिटरच्या टप्प्याचे काम व्हायचे बाकी आहे. सध्या बंधाऱ्याच्या टॉप लेअरचे काम सुरू आहे. दोन-अडीच वर्षानंतरही काम अर्धवट असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यात समुद्र खवळल्यानंतर समुद्राच्या उधाणाच्या लाटा मिऱ्या येथील लोकवस्तीमध्ये शिरतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत.

डेंजर स्पॉटचेच काम अर्धवट
पत्तन विभागाकडे याबाबत खात्री केली असता त्यांनी याला दुजोरा दिला; परंतु पांढरा समुद्र ते जयहिंद चौक हा अडिचशे मीटरचा टप्पा शिल्लक आहे. पाण्याचा प्रवाह या भागात जास्त असल्याने उधाणाचे पाणी अनेकांच्या बागांमध्ये येत असल्याच्या तक्रारी यापूर्वी झाल्या आहेत. डेंजर स्पॉटपैकी हा एक स्पॉट आहे. त्यामुळे पावसाळ्यातील उधाणामुळे या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow