विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ : मनोज जरांगे

Jul 5, 2024 - 13:07
 0
विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेऊ : मनोज जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्याला घेऊन राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. त्यात राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणुकीवर महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

13 तारखेनंतर 288 उभे करायचे की 288 पाडायचे ठरवणार, असे मनोज जरांगे म्हणाले. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.

मराठा आरक्षणातील (Maratha Reservation) सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावर राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी 13 जुलै पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे असं शंभुराज देसाई म्हणाले होते. यावर मनोज जरांगे म्हणाले, ठरल्याप्रमाणे शंभूराज देसाई आम्हाला न्याय देतील. पुढील दिशा 13 तारखेला नंतर ठरवू. राजकारणात आम्हाला जायचं नाही , पण नाही दिले तर आम्ही न्याय कुठून घ्यायचा? म्हणून समाजाला विचारून ठरवू 288 उभा करायचे की 288 पडायचे?

मनोज जरांगेचे मराठा समाजाला आवाहन

उद्यापासून मनोज जरांगे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. हिंगोली शहरामध्ये मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता रॅली निघणार आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले, शांतता रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सर्वांनी आपली कामं सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र या, बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही.

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं : मनोज जरांगे

मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं मुलींचे अॅडमिशन सुरू झालेले आहेत. अॅडमिशन झालेल्या मुलींचे पैसे परत करायला लावा, अशी मागणी देखील मनोज जरांगेंनी केली आहे.

मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याचा दौरा

मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात हिंगोली दिल्यापासून केली जाणार आहे. हिंगोली शहरामध्ये उद्या मनोज जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता रॅली काढली जाणार आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरांमध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र येणार आहे रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये 200 भोंगे लावण्यात आलेत . बाराशे स्वयंसेवक सेवा देणार आहेत यामध्ये 200 महिलांचा सहभाग आहे. आरोग्य विभागाच्या वतीने 16 आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच ठिकाणी LED वॉल , सहा ठिकाणी टेहाळणी टॉवर असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 05-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow