कोंडगावात मिऱ्या-नागपूर महामार्गाला तडा
साखरपा : नव्याने बांधण्यात आलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गाला संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे तडा गेला आहे. अवघ्या दोन महिन्यांतच हा तडा गेल्याने महामार्गाच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिऱ्या-नागपूर महामार्ग सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. आधीच झालेला विलंब त्यातून आता महामार्गाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे तयार झालेले खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे हा महामार्ग नेहमीच चर्चेत आहे. त्यातच अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बांधून झालेल्या महामार्गाच्या एका मार्गिकेला तडा गेल्याचे समोर आले आहे.
कोंडगावनजिक इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रस्त्याला हा तडा गेल्याचे गेला आहे. सुमारे वीस फूट लांब हा तडा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. अवघ्या दोन महिन्यांत जर ही अवस्था होणार असेल तर महामार्गाचा दर्जा काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:42 PM 05/Jul/2024
What's Your Reaction?