रत्नागिरी : शालाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी 20 जुलैपर्यंत विशेष मोहिम

Jul 9, 2024 - 14:49
Jul 9, 2024 - 14:52
 0
रत्नागिरी : शालाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी 20 जुलैपर्यंत विशेष मोहिम

रत्नागिरी : पालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्यात दिनांक १ एप्रिल २०१० रोजी लागू करणात आलेला आहे. या कायद्यानुसार वर्ष ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे.

शाळेत कधीच दाखल न झालेली बालके तसेच शाळेत न जाणारी बालके ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही, ज्या बालकांनी शाळेत प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नसेल अशा ६ ते १४ वयोगटातील एका महिन्यापेक्षा जास्त काळ सातत्याने अनुपस्थित राहत असलेल्या शालाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात शुक्रवार ५ जुलैपासून शोध मोहीम हाती येण्यात आली आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत चालणार आहे.

अस्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद
बालकाचे मोफत व सक्तीचा अधिनियम अधिकता २००९ मधील कलम चार नुसार अशा स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून त्याद्वारे बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल. त्यामुळे शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात लागणे, बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर थांबवणे, स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रयास कायाम ठेवणे, स्थलांतरित होणाऱ्या बालकांना शिक्षण हमी कार्ड देणे या उद्देशाने ५ जुलै ते २० जुलै २०२४ या कालावधीमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कुटुंबे विविध व्यवसायाच्या निमिताने स्थलांतर करीत असतात ही कुटुंबे वंचित घटकातील भूमिहीन अथवा अल्पभूधारक असतात.या स्थलांतरामुळे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती जास्त आहे.

रस्त्यावर काम करण्यासाठी तसेच बांधकामे, रस्त्यावर वस्तू विक्रीसाठी ही कुटुंबे शेजारी असणाऱ्या कर्नाटक व राज्यस्थानहून येतात सदर साधारणतः सप्टेंबर ते मे या कालावधीत होत असते वीटभट्टी, दगडखाण मजूर, रसटे कोळसाप्राणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्याची तसेच रस्ते, नाले, जीनिग मिल इत्यादी प्रकारच्या कामानिमित्त विविध कामगार स्थलांतर करीत असतात त्याचबरोबर दिव्यांग बालकांचे बाबतहीची आव्हाने देखील अधिक वाढत आहेत. त्यामुळे या बालकांचा देखील विचार होणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow