चिपळुणात श्री गणेश गौरव पुरस्कारांचे वितरण

Sep 19, 2024 - 15:57
 0
चिपळुणात श्री गणेश गौरव पुरस्कारांचे वितरण

चिपळूण : चिपळुणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश गौरव पुरस्कारांचे वितरण सोमवारी करण्यात आले. यावेळी नवकोकण एज्युकेशन सोसायटी चिपळूणचे अध्यक्ष बापूसाहेब भिडे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय गांधी, श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, प्रकाश काणे, माधुरी पोटे, राजा पाटणकर, सल्लागार सुधीर पोटे, मिलींद पिंपुटकर, विलास बद्रि, बाळा वेस्वीकर, सीमा रानडे, पंकज शेट्ये, उपस्थित होत्या.

यावेळी चिपळूण सायकलिंग क्लब, गौरव लवेकर (शिवकालीन नाणी संग्राहक), अभिषेक गांधी (ऑस्ट्रेलियामधील विद्यापिठातून आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून मास्टर पदवी), प्रा. सोनाली खर्चे बराडे (शिक्षण क्षेत्र, लेखन, योग, कला क्षेत्रात भरीव कामगिरी), अपर्णा मेहेंदळे (भगवतगीता राष्ट्रीय पुरस्कार), शंकरराव चव्हाण (समाजभूषण पुरस्कार प्राप्त), प्रसाद मोरेश्वर उर्फ भाऊ कार्ले (रंगकर्मी), श्रेया कुलकर्णी (एम. फार्मसी सुवर्णपदक), अनिरुद्ध भागवत (एम. कॉम. मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात प्रथम), मिलिंद केळकर (व्यावसायिक), मोहन मिरगल (चेअरमन चिपळूण अर्बन बँक), सुनिल कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ता), योगेश बांडागळे (रंगकर्मी), अजिंक्य पवार (प्रो- कब्बडी खेळाडू), अजिंक्य पवार (कबड्डीपटू), ऋषिकेश भोजने (कबड्डीपट्टू), अलका वरवडेकर (हार्मोनियम वादक व गणेश मूर्तीकार), संजय जोशी (वृत्तपत्र वितरक), महेश जाधव, सुजित जाधव, विनायक सावंत, प्रविण जाधव (नगर परिषद आरोग्य निरीक्षक), विनय मोहिते (गुणवंत वीजमंडळ कर्मचारी), सागर भुरण (गुणवंत वीजमंडळ कर्मचारी), दिनेश जाधव (न. प. गुणवंत सफाई कर्मचारी), मयुर जाधव (न.प. गुणवंत सफाई कर्मचारी), साहस नारकर (विद्यापीठ स्तर बुद्धिवळ खेळाडू) यांना गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:25 PM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow