महाविकास आघाडीच्या शिबिरात लाडकी बहिण योजनेचे अर्ज कार्य नये : चित्रा वाघ

Jul 10, 2024 - 11:53
Jul 10, 2024 - 11:53
 0
महाविकास आघाडीच्या शिबिरात लाडकी बहिण योजनेचे अर्ज कार्य नये : चित्रा वाघ

मुंबई : महिलांनी महाविकास आघाडीच्या शिबिरात अर्ज करु नये. कारण, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत (Ladki Bahin Yojana) फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.

महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट आहे. अॅप, सेतू केंद्र किंवा पोर्टलवर स्वत: अर्ज भरण्याचे आवाहन वाघ यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिबीरात महिलांनी अर्ज करु नये. कारण, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे वाघ म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 10-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow