लांजा : हसोळ येथे तरुणावर सुरीहल्ला

Jul 11, 2024 - 12:18
 0
लांजा : हसोळ येथे तरुणावर सुरीहल्ला

लांजा : तालुक्यातील हसोळ बौद्धवाडी ३७ वर्षीय तरुणाच्या गळ्यावर येथे सुरीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना मंगळवारी ९ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या बाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसोळ बौद्धवाडी येथील मिलिंद अशोक कांबळे (वय ३७) यांनी याबाबतची फिर्याद लांजा पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी राजेंद्र रूपाजी कांबळे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५, ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नासीर नावळेकर हे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow