मंडणगड : तुळशी माहू घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Jun 27, 2024 - 10:44
 0
मंडणगड :  तुळशी माहू घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

मंडणगड : तालुक्यातील राष्ट्रीय महमार्गावर तुळशी माहू घाटात आज सांयकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा एकदा दरड कोसळली असून मातीचा भराव रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली. तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सर्वाधिक फटका या घाटाला बसतो आहे. रस्त्याकामी खोदलेल्या डोंगरामुळे तो आता ढासळतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाऊस सुरू झाल्यापासून या मार्गावर अनेक घटना घडत आहेत. दरड खाली येणे, मोठे दगड कोसळणे, पाणी साचणे, रस्ता खचणे यांसारख्या असंख्य घटनांनी हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. जुना रस्ता खोदून या मार्गावर नव्याने काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. ते झाल्यानंतर हा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होईल, या आशेला ग्रहण लागले आहे. विविध अडथळ्यांनी उलट या मार्गावरील प्रवास हा त्रासदायक आणि धोकादायक बनला आहे. अजूनही मार्गावरील रस्त्याचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. हा वळणांचा घाट रस्ता असल्याने पावसाळ्यात ते पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र ते रखडलेले आहे. परिणामी या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी रस्त्यावरच पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या पाण्यासाठी गटारांची तरतूद करण्यात आली आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. मातीचा भराव हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून यामुळे काही काळ वाहने थांबून राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow