रत्नागिरीत तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न

Jul 11, 2024 - 10:03
Jul 11, 2024 - 12:45
 0
रत्नागिरीत तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न

रत्नागिरी : तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे, ओमसाई मित्र मंडळ येथील खेळाडू अस्मी साळुंखे हिने तायक्वांदोमध्ये ४ सुवर्ण व १ रौप्य पदक अशी एकूण ५ पदके पटकावून यश संपादन केले व स्पर्धेत विशेष ठसा उमटवला आहे. अस्मी साळुंखे ही पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी येथील विद्यार्थिनी असून ती इ. ५ मध्ये शिकत आहे. तिच्या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक राम कररा, सहप्रशिक्षक तेजकुमार लोखंडे, प्रतीक पवार, अमित जाधव, महिला प्रशिक्षक शशिरेखा कररा तसेच तिची आई तन्वी साळुंखे व वडील तुषार साळुंखे यांचे सहकार्य लाभले. अस्मी हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 11/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow