देवरुखात २ ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन

Jul 11, 2024 - 14:19
 0
देवरुखात २ ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन

देवरूख : राज्य एस.टी. महामंडळाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक आगारामध्ये प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २ ऑगस्ट रोजी विभाग नियंत्रक देवरूख आगाराला भेट देणार आहेत. 

आगारातील प्रसाधनगृहे, कर्मचाऱ्यांची विश्रांती कक्ष, याचबरोबर संपूर्ण आगार हे स्वच्छ असले पाहिजेत. कर्मचाऱ्यांची चांगली वागणूक प्रवाशांशी असली पाहिजे. भारमान वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी चांगली वर्तणूक ठेवावी. यासाठी मंडळाने प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा उपक्रम हाती घेतला आहे. विभाग नियंत्रक यांच्या भेटीमध्ये प्रवासी, कर्मचारी वृंद यांच्याशी चर्चा करून आगाराचा कारभार सुधारावा, यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:47 11-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow